सामान्य स्त्री-पुरुषांची जिद्द आणि ताकद यांचा गौरव करण्यासाठी कौन बनेगा करोडपती हा गेम शो आपला 16 वा सीझन घेऊन परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर. ‘जिंदगी है. हर मोड पर सवाल पूछेगी. जवाब तो देना होगा’ हे या सीझनचे अभियान आपल्याला अंतर्मुख करणारे आहे तसेच हा विचार देखील देणारे आहे की, एखाद्या निर्णायक क्षणी जीवन आपल्यापुढे आव्हाने उभी करते आणि त्याला आपण जी प्रतिक्रिया देतो, त्यातूनच आपला पुढचा मार्ग निघतो. 12 ऑगस्ट पासून सुरू होत असलेला हा गेम शो दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. यावेळीही आपल्या सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन होस्टच्या रूपात दिसणार आहेत. गेल्या 24 वर्षांपासून हा शो लक्षावधी प्रेक्षकांसाठी आशा आणि ज्ञानाचा किरण ठरलेला आहे. यंदा या शोमध्ये काही नवीन गोष्टी दाखल केल्यामुळे हा सीझन अधिक रोमांचक आणि आकर्षक असेल, यात शंकाच नाही.

या वर्षी, स्पर्धकांना एका वेगळ्याच ट्विस्टचा सामना करावा लागणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे ‘सुपर सवाल’. सुपर सवाल हा एक बोनस प्रश्न असेल, जो प्रश्न क्रमांक 5 आणि 6 च्या मध्ये विचारण्यात येईल. ज्याचे उत्तर कोणत्याही लाइफलाइनची किंवा पर्यायांची मदत न घेता स्पर्धकाला द्यावे लागेल. उत्तर अचूक असेल तर त्याला ‘दुगनास्त्र’ मिळेल, ज्याचा उपयोग तो प्रश्न 6 ते 10 पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना करू शकेल. अशा वेळी उत्तर देण्याअगोदर स्पर्धक बझर दाबून बक्षिसाची रक्कम दुप्पट करू शकेल. या सीझनमध्येही झटपट चालणारी ‘सुपर संदूक’ असेल, जी गेम अधिक रोमांचक करते. 3,20,000 रु जिंकल्यानंतर स्पर्धकाला एका 10 प्रश्नांच्या रॅपिड फायर क्विझला सामोरे जावे लागेल आणि 90 सेकंदात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या सीझनमध्ये 22 ब्रॅंड त्यांचे सोबती आहेत. हा शो हुंडई मोटर इंडिया लिमिटेड आणि आदित्य बिर्ला ग्रुप द्वारा को-प्रेझेंटेड आहे, तर माऊंटेन ड्यू पेप्सिको इंडिया, मॉन्डेलेझ इंडिया, अल्ट्राटेक सीमेंट आणि पराग मिल्क फूड्स (गोवर्धन घी) द्वारा को-पावर्ड आहे. त्यांचे स्पेशल पार्टनर्स आहेत पतंजलि दन्त कान्ति, सीएट आणि लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन. बँकिंग पार्टनर आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, असोसिएट स्पॉन्सर आहेत एशियन पेंट्स, कल्याण ज्वेलर्स, रेमन्ड, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बिकाजी, डॉरसेट, RC प्लास्टो टॅंक आणि पाईप्स प्रा. लि., अमेझॉन.इन आणि आकाश एड्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड. तसेच, या रियालिटी क्विझ शो च्या भारतीय रिझर्व बँक, GSK आणि डॉ. मोरपेन यांच्यासोबत लार्ज पार्टनरशिप डील्स आहेत.

12 ऑगस्ट पासून सुरू होत असलेला कौन बनेगा करोडपती सीझन 16 दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून !