kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोनियाजी गांधी यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी दगडूशेठ गणपतीची महाआरती ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाअभिषेक

अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज (शनिवारी) महाआरती केली.

आदरणीय सोनियाजी गांधी यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मा.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२ ते १० डिसेंबर या कालावधीत सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, दत्ता बहिरट, कमलताई व्यवहारे, लताताई राजगुरू, रजनी त्रिभुवन, बाळासाहेब अमराळे, द.स.पोळेकर, नीता रजपूत, स्वाती शिंदे, नाना मारणे, प्रशांत सुरसे, रेखा गेहलोत, ॲड.शाबीर खान, ॲड.निलेश बोराटे, चेतन अगरवाल, अंजली सोलापूरे, कान्होजी जेधे, साहिल राऊत, पल्लवी सुरसे, मंगला चव्हाण, ॲड.मोनिका खलाने, बाबा सय्यद, रामविलास माहेश्वरी, उमेश काची, साहिल भिंगे, बंडू शेडगे, प्रसन्न मोरे, नरेश धोत्रे, अक्षय सोनवणे, अभिजीत महामुनी, वैशाली रेड्डी, सोनिया ओव्होळ, धनंजय भिलारे आदी उपस्थित होते. महाआरतीचे संयोजन प्रविण करपे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे यांनी केले.