विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना ठाकरे गट 13, कांग्रेस 8 , राष्ट्रवादी 1 आणि समाजवादी 1 या जागेवर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे.

36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला असून उरलेल्या 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहावं लागेल. वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. दोन पक्षांमध्ये ती जागा अडचणीची ठरण्याची शक्यता

संभाव्य जागा पुढील प्रमाणे :

शिवसेना ठाकरे गट :

  • विक्रोळी विधानसभा
  • भांडुप पश्चिम विधानसभा
  • दिंडोशी विधानसभा
  • अंधेरी पूर्व विधानसभा
  • चेंबूर विधानसभा
  • कलिना विधानसभा
  • वरळी विधानसभा
  • शिवडी विधानसभा

काँग्रेस :

  • मालाड पश्चिम विधानसभा
  • धारावी विधानसभा
  • मुंबादेवी विधानसभा
  • वांद्रे पश्चिम
  • चांदीवली विधानसभा
  • कांदिवली पूर्व

राष्ट्रवादी पवार गट :

घाटकोपर पूर्वची जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळणार असल्याची माहिती आहे.