राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. आज ही यात्रा सोलापुरात आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरकरांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सत्तेतील नेत्यांनी काढून ठेवले आहेत. वडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले, मला मत नाही दिले तर तुमच्या खात्यात दिलेले पैसे काढून घेईन… भाजपाच्या समर्थक आमदार एवढी माग्रुरी दाखवत आहे. आपला पराभव होणार हे माहिती आहे म्हणून यांनी योजना काढल्या आहेत आणि जाहिरातीसाठी 280 कोटी खर्च केला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असं देशात कोणाला वाटत नव्हतं. मात्र महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्याने कामगिरी केली. 2019 च्या निवडणुकीआधी शरद पवार साहेब सोलापूरला आले तेव्हा प्रचंड गर्दी केली. मागीलवेळी शिवस्वराज्य यात्रा काढली. त्यावेळी 54 जागी विजयी झालो. यावेळी कितीतरी जास्त जागी आम्ही निवडून येऊ… त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील दोन मराठी नेत्यांनी निर्माण केलेले दोन्ही पक्ष भाजपने फोडले. पवार साहेबांना सोडून गेलेल्या नेत्यांसोबत जनता गेली का तर नाही. महाराष्ट्रात मोठ मोठे इव्हेंट पाहायला मिळतात. प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सत्तेतील नेत्यांनाही परभवाची चाहूल लागली आहे. आता आपण काम करायचं आणि आपलं सरकार आणायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
राज्यात आणि मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटचा आमदार निवडून येणार आहे. साताऱ्यातील महेश शिंदे नमक आमदार म्हणतात, की आत्ता तुम्ही निधी घ्या. निवडणुकीनंतर स्क्रूटीनी करू…. आता वेळ आली आहे महाराष्ट्रातील सरकार बदलण्याची… आता आपण कामाला लागले पाहिजे. मोहोळमध्ये एकत्र येऊन एकच उमेदवार ठरवा. 100 टक्के विजयी होणारा उमेदवार निवडा आणि उमेदवार कसा विजयी होईल ते पहा, अशा सूचना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत.