kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला म्हणाल्या ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशात सरकार आलं. गेल्या दहा वर्षात या सरकारने काय केलं? त्यांनी रोजगार तर दिलेच नाही, पण रोजगार घटवले आहेत. पाच किलो राशन दिलं. चांगलं झालं. पण या पाच किलो रेशनमध्ये तुमच्या मुलांचं भविष्य घडवलं जाणार आहे का? असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. मोदींना वाटतं पाच किलो राशन दिलं म्हणजे सर्व काही झालं. एवढंच पुरेसं आहे. पाच किलो राशनमध्ये तुमचं काय होणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

प्रियंका गांधी आज लातूरमध्ये आल्या होत्या. प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 1200 रुपये तुम्ही गॅस सिलिंडरला मोजत होता. निवडणूक आल्यावर मोदी म्हणाले, 400 रुपये सिलिंडर देणार. निवडणुका पाहून त्यांनी हा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षापासून यांचं केंद्रात सरकार आहे. एवढ्या वर्षात गॅस महागडा केला. आता कमी केला. याचा अर्थ काय? तुम्हाला बेरोजगार ठेवलं अन् पाच किलोचं राशन देण्याची मेहरबानी केली. शेतकरी आत्महत्या करत आहे. सोयाबीनच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

गेल्या दहा वर्षात यांनी रोजगार बंद केले. चुटकी वाजवून काय केलं? रोजगार निर्माण केले नाही. महागाई कमी केली नाही. महिलांसाठी काहीच केलं नाही. जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे. तिथे महिलांना पैसे दिले जात आहे. कर्नाटकात गरीब कुटुंबातील महिलांना दोन हजार रुपये मिळत आहेत, असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

काँग्रेसने या ठिकाणी खूप विकास केला. मोठ्या फॅक्ट्री तयार झाल्या त्या केवळ काँग्रेसमुळे. तुमच्याशी मला गंभीर गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्ही गांभीर्याने विचार करा. आपला देश कुठे आहे हे पाहा. आज देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी आहे. केंद्रात 30 लाख पद खाली आहे. पण भरले नाही. 70 लाख लोक बेरोजगार आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक समस्यांचा सामना केला आहे. मोदी सरकार पद भरत नाही, असा आरोप त्यांनी केला.

मोदी सरकारने अब्जाधीशांना 16 लाख कोटी रुपयांची कर्ज माफी दिली. शेतकऱ्यांना काय केलं? या देशातील शेतकऱ्यांना जीएसटी दिली. शेतकरी दिल्ली आंदोलनात मेले. 600 शेतकरी मेले, पण मोदी घराच्या बाहेर आले नाही. निवडणुका आल्यावर नौटंकी सुरू होते. मोठमोठी आश्वासन दिले जातात. कुणाच्या खात्यात आले 15 लाख सांगा?, असा सवाल त्यांनी केला.