Breaking News

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचं आव्हान होतं. अतिशय कांटे की टक्कर सुरु असताना अखेर अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला आहे. अमोल किर्तीकर हे सुरुवातीला 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी झाली. किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कांटे की टक्कर झाली. पहिल्या फेरीपासून दोघांमध्ये जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. पण त्यावर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना 4 लाख 995 मते, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मते मिळाली होती. ईव्हीएममध्ये वायकर यांना अवघे एकच मत अधिक होते. त्यानंतर 3049 पोस्टल मतांची मोजणी झाली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना 1500 तर रविंद्र वायकर यांना 1549 मते मिळाली. त्यानंतर वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.