Breaking News

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया , म्हणाले ..

ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला मी त्या निर्णयाचा आदर करतो असे ते म्हणाले. अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायलयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी नमूद केलं.

मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठा संस्थेला काही शौचालय बनवण्याची काम मिळाली. त्यामध्ये घोटाळा झाला असा आरोप मी केला नाही. तर असा आरोप सर्वात आधी तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी लावला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. याप्रकरणी एक आदेशही पारित करण्यात आला . यात मी अब्रुनुकसानी करण्याचा संबंध कुठे आला, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच मी फक्त त्याबद्दल,भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न विचारले होते. असे प्रश्न तर किरीट सोमय्याही करतात, आरोप करतात. आम्ही वरच्या न्यायलयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं राऊत नमूद केलं.