महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमच्यातील भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे, असे म्हणत भविष्यात मनसेची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती होऊ शकते, असे सूचक विधान केले. त्यानंतर राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या भावना मांडताना दिसत आहेत. तर बाकीचे पक्ष नेते आणि कार्यकर्ते देखील यावर भाष्य करताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी देखील यावर मत मांडले आहे.
काय म्हणाल्या अयोध्या पोळ ?
दोन भाऊ एकत्र येत असतील तर इतरांनी जळफळाट करुन घेण्याचं कारण काय?
भाऊ एकत्र येत आहेत याचा माझ्यासारख्या करोडो कार्यकर्त्यांना आनंदच आहे..
दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना या युतीच्या चर्चेवर काहीही बोलू नये, असा आदेश दिला आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. ते महाराष्ट्रात आले की युतीच्या चर्चेवर ते भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या हातमिळवणीविषयी भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Leave a Reply