आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48. 66 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे दिंडोरी येथे झाले असून त्या खलोखाल पालघर मतदारसंघात मतदानाची आघाडी बघायला मिळत आहे. तर तिकडे धुळे लोकसभेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48. 81 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्या अनुषंगाने दुपारी तीन वाजेपर्यंतची विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. धुळ्यात सकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात मतदानाला हजेरी लावली. मात्र दुपारच्या सुमारास धुळ्यात मतदान काहीसे थंडावल्याचे चित्र बघायला मिळाले. आतापर्यंत धुळे मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे मध्य मालेगावचे नोंदवल्या गेले आहे. तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही सिंधखेड येथे झाली आहे. बागलाण येथे 47.01 टक्के, धुळे शहर येथे 46.16 टक्के मतदान झाले आहे. तर धुळ्याच्या ग्रामीण भागातही 50.31 टक्के मतदान झाले आहे. मालेगाव मध्य 57.02 टक्के, मालेगाव आऊटर येथे अवघे 47 टक्के मतदान झाले, तर सिंधखेड येथे 45.84 टक्के असे एकूण धुळे लोकसभेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48. 81 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

महाराष्ट्र सरासरी – 48.66 टक्के

भिवंडी – 48.89 टक्के
धुळे – 48.81 टक्के
दिंडोरी – 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
उत्तर मुंबई – 46.91 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 47.32 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के
दक्षिण मुंबई – 44.22 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के
नाशिक – 51.16 टक्के
पालघर – 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के