अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत.
त्या म्हणाल्या की, 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक कार्यक्रम व योजना जनतेच्या हितासाठी केल्या.
सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी सर्वांसाठी विकासाची चर्चा आहे. 2047 पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू.
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.