राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील डीपी चेंज केला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. जागावाटपाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक जण अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे. त्यामुळे जयंत पाटील नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.