kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा..

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

काय काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे म्हणाले, सभा शिमल्याला आहे की काय असं वाटतं आहे. २०२४ ला आत्ता निवडणुका होत आहेत. आता आचारसंहितावाले जागे झाले आहेत. निवडणुकीसाठी महापालिकेची हॉस्पिटल्स आहेत तिथले डॉक्टर्स आणि नर्सेस यांना कामावर जुंपलं आहे. डॉक्टर काय मतदारांची नाडी बदलणार का? नर्सेस डायपर बदलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. गुढी पाडव्याच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंनी हा सवाल केला आहे. ज्या डॉक्टर आणि नर्सेसवर निवडणुकींची जबाबदारी जाऊ नये. रुग्णांची सेवा करताय त्या रुग्णालयात जा, तुम्हाला नोकरी वरुन कोण काढतं मी बघतो, असा इशारा राज ठाकरेंना दिला आहे.

आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्यांनाच मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. सणावाराचे दिवस आणि सभा असताना पोलीस यंत्रणेवरही ताण असतो. अशा कामांना सहकारी, पोलीस जेव्हा जुंपलेले असतात तेव्हा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे, कॉन्स्टेबल माता-भगिनी यांच्या प्रति मी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला काम करावं लागतं आहे. जसं तुम्ही ऐकत होतात तसं मीपण ऐकत होतो. तुम्ही वाचत होतात, तसं मीपण वाचत होतो. अमित शाह यांच्या भेटीनंतर चक्रं सुरु झाली आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. चॅनलवाल्यांचा काही दोष नाही.

रोजच्या चॅनल्सना मी नाव ठेवलंय आज मला असं वाटतं. कारण वाट्टेल त्या बातम्या सुरु होत्या. मी एंजॉय करत होतो. अमित शाह यांना दिल्लीला भेटलो. अमित शाह आणि मी आम्हीच होतो. तुम्हाला कुठून कळलं काय बोललो? मी दिल्ली पोहचलो. राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली. अरे दुसऱ्या दिवशीची भेट होती. हे थांबतच नाहीत, मला असे वाटते (चॅनलवाले) असा टोला राज ठाकरेंनी लगावला. तिकडे काही पत्रकार भेटले. माझ्याकडे सांगण्यासारखंच काही नव्हतं. त्यामुळे मी पत्रकारांना नाही भेटलो. जाताना पण वो देखो जा रहें है.. हल्ली हे असतात. पुर्वी आचारसंहितावाले असायचे. एकदा मी बाथरुमला चाललो होतो तेव्हा तो माझ्या मागे आला. त्याला विचारलं पुढे काय करणार आहेस? माझं मीच करायचं की काही सहकार्य करणार आहेस? मी घराच्या बाहेर पत्रकार बसलेले असतात. त्यांना मी म्हटलं एखादी गोष्ट ठरली तर मी सांगेन. की लपून लपून निवडणूक लढवेन? काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करेन.

अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात आलं. मग मला असे वाटतेचा एपिसोड कसा पुढे न्यायचा? मग राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. माझ्या घरी ३२ आमदार, सहा सात खासदार एकत्र बाहेर पडू वगैरे ठरलं होतं. मी नावं घेत नाही. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. माझ्या मनात विचार नाही. पण मी पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. ही गोष्ट मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरेंशिवाय यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. पण त्याला काही कळलंच नाही असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी महाराष्ट्र निर्माण सेना हे अपत्य जन्माला घातलं आहे. मी याच पक्षाचा प्रमुख राहणार असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.