kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांनाश्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिनेता आणि अप्रतिम परफॉर्मरच्या उपस्थितीमुळे एकनवीनच झळाळी मिळणार आहे. सचिन या मालिकेचा सूत्रधार आणि मार्गदर्शक आवाज असेल.

सूत्रधार या नात्याने सचिन पिळगांवकर प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मार्गदर्शन देईल आणि साई
बाबांचा साधा संदेश देखील कीती दमदार आणि अर्थपूर्ण आहे, आजच्या जीवनाशी सुसंगत आहे हे प्रेक्षकांना समजावून सांगेल. आपल्या आकर्षक आवाजात तो कथेचे मर्म सांगेल आणि त्यातील करुणा आणि आशा या मूल्यांची जाणीव करून देईल. भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजनला अष्टपैलूत्वाचा एक मोठा वारसा देणारा सचिन पिळगांवकर आपल्या निवेदनातून या मालिकेला एक गांभीर्य आणि भावनिक गहनता प्रदान करेल. साई बाबांच्या चरणी असलेली त्याची निष्ठा सूत्रधार म्हणून त्याच्या
भूमिकेला एक भावनिक जोड देईल.

सचिन पिळगांवकर म्हणतो, “हा माझ्यासाठी काही एखादा व्यावसायिक टप्पा नाही, तर याचाभक्तीशी संबंध आहे. मी पहिल्यापासून साई बाबांचा भक्त आहे. त्यांची शिकवण हा माझ्याजीवनातील शक्ती आणि मार्गदर्शनाचा कायमी स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर आला, तेव्हा मी त्याकडे केवळ माझ्या व्यावसायिकतेचा एक भाग म्हणून पाहिले नाही, तर माझ्या श्रद्धेला जणू ही माझी आदरांजलीच असेल, असे मला वाटले.मी आशा करतो की माझ्या निवेदानातून मी साधेपणा, गहनता आणि बाबांच्या सुजाणतेचा कालातीत
संबंध मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकेन आणि लोकांना हे स्मरण देऊ शकेन की त्यांच्या प्रेम, करुणा आणि विनम्रता या मूल्यांची आज समाजाला खूप जास्त गरज आहे.”

बघा ‘शिरडी वाले साईं बाबा’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 7 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट

टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *