kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये शुभम सूत्रधार या स्पर्धकाची प्रशंसा करताना टेरेन्स लुईस म्हणाला, “तुझ्या गायकीत मला किशोर दां ची सहजता दिसते”

 
या वीकएंडला, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपरस्टार सिंगर 3’ मधील ‘गर्ल्स व्हर्सेस बॉइज’ या
शीर्षकाखालील खास एपिसोडमध्ये एक सांगितीक जलसा पेश होणार आहे. या एपिसोड दरम्यान प्रेक्षकांना
या मुला-मुलींमधील अप्रतिम जुगलबंदी अनुभवता येईल, जी खरोखर गंमतीशीर असेल. उत्साहात भर
घालण्यासाठी, 13 जुलै रोजी होणार्‍या ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4’ च्या प्रीमियर पूर्वी, माननीय
जज गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांचे मंचावर स्वागत केले जाईल. हा जोमदार एपिसोड नक्कीच
सगळ्या चाहत्यांसाठी संगीत आणि नृत्याचे आकर्षक मिश्रण असलेली पर्वणी असणार आहे.
 
एकमेकांसमोर परफॉर्म करण्यासाठी सिलिगुडी, पश्चिम बंगाल येथील अद्भुत प्रतिभा असलेला शुभ सूत्रधार
आणि पंजाबची लाइसेल राय यांची जोडी बनवण्यात आली होती. त्यांनी ‘दिल क्या करें’ आणि ‘दो लफ्झों
की है’ ही गाणी म्हटली. दोन्ही स्पर्धकांनी आपल्या भावपूर्ण परफॉर्मन्सने परीक्षकांना थक्क केले आणि त
त्यांच्याकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळवले! खास अतिथी टेरेन्स लुईस जो लवकरच ‘इंडियाज बेस्ट डान्सर
सीझन 4’मध्ये जज म्हणून दिसणार आहे, तो त्यांच्या परफॉर्मन्सने प्रभावित झाला आणि त्यांची प्रशंसा
करत म्हणाला, “तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सने मी आज भारावून गेलो. लाइसेल, तू ज्या प्रकारे गायलीस
त्याने मी थक्क झालो, तुझ्या आवाजात पाश्चिमात्य आणि भारतीय शास्त्रीय गायकीचा खूप छान
समतोल आहे. खूपच छान! आणि शुभ, तुझ्या गाण्याने तर मी पागलच झालो आहे. किशोर दांच्या
गाण्याइतकेच ते अप्रतिम होते. तू इतक्या सहजतेने परफॉर्म केलेस, केवळ अविश्वसनीय! तुझ्या गायकीत
मला किशोर दां ची सहजता दिसली. अप्रतिम!”
 
सुपर जज नेहा कक्कडने पुष्टी जोडली, “तुम्ही दोघेही अतिशय सुंदर आणि कसलेल्या गायकांसारखे
गायलात. शुभने माझे आवडते गाणे गायले आणि त्यातला शब्दन् शब्द मी अनुभवत होते, इतका रोमान्स
त्यात होता. शुभ, तू इतक्या सहजतेने गातोस की तुला ऐकताना प्रत्येक वेळी मी थक्क होते. लाइसेल, तू
देखील, ज्या क्षणी गायला सुरुवात केलीस तेव्हाच सर्वांची मने जिंकलीस. तू दोन शैली या गाण्यात
दाखवल्यास. शाब्बास!”
 
परीक्षक गीता कपूर देखील दोघांची प्रशंसा करत म्हणाली, “तुमच्या सुरेल आवाजाने मी थक्क झाले, तुम्ही
सतत इतके अप्रतिम कसे परफॉर्म करता? शुभ, इतक्या लहान वयात तुझा आवाज एखाद्या हीरोसारखा
आहे, हे केवळ अद्भुत आहे. आणि लाइसेल, तुझ्या आवाजात आणि व्यक्तिमत्त्वात जो गोडवा आहे, तो
खूपच सुंदर आहे.”
 
बघा ‘सुपरस्टार सिंगर 3’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!