kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्राचा कौल कुणाला ?? वाचा सर्व एक्झिट पोलचे अंदाज क्षितिज न्यूजवर !

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यनकीयत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राज्यभरात आज संध्याकाळी ५. ०० वाजेपर्यंत ५८. २२ टक्के मतदान पार पडले. ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. दरम्यान राज्यात महायुती की महाविकास आघाडीचे सरकार येणार हे पाहणे आवश्यक असणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात हे आपण जाणून घेऊयात.

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती विजय मिळवून महाराष्ट्रात सत्ता कायम ठेवेल असा अंदाज काही एक्झिट पोल्सनुसार वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मॅट्रीक्स, पोल डायरी, चाणक्य, पी-एमएआरक्यू या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यचा एक्झिट पोल काय?

महायुती १५२ ते १६० : भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२
महाविकास आघाडी १३० ते १३८ : काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?

महायुती १५० ते १७० : भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६

महाविकास आघाडी ११० ते १३० : काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३

पोल डायरीचा अंदाज काय?

महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवसेना (शिंदे) २७ -५०, राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २८-४७, शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज.

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील युती १७५ ते १९५ जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १५० ते १७० जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ११० ते १३० जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.

टाईम्स नाऊ एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १०५ ते १२६, महाविकास आघाडीला ६८ ते ९१ आणि इतर पक्ष आणि अपक्षाला ८ ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कोणलाा किती जागा?

*महायुती – १२८-१४२

भाजप – ८०-८५

शिवसेना (शिंदे गट) – ३०-३५

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – १८-२२

*महाविकास आघाडी – १२५-१४०

काँग्रेस- ४८-५५

शिवसेना (ठाकरे गट) – ३९-४३

राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ३८-४२

इतर – १८-२३


ZEE AI POLL च्या अंदाजानुसार राज्यात कोणाला किती जागा ?

एकूण महाराष्ट्र

महायुती ११४-१३९

मविआ १०५-१३४

इतर ०-८

मराठवाडा (एकूण जागा ४६ )

महायुती १६-२१

मविआ २४-२९

इतर ०-२

विदर्भ (एकूण जागा ६२ )

महायुती ३२-३७

मविआ २४-२९

इतर ०-२


SAS GROUP HYDRABAD च्या अंदाजानुसार राज्यात कोणाचे सरकार ?

महायुती १२७-१३५
मविआ १४७-१५५
इतर १०-१३

विदर्भ (एकूण जागा ६२)
मविआ ३३-३५
महायुती २६-२७
इतर २-३

पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा ७०)
मविआ ४०-४२
महायुती २७-२८
इतर २-३

मराठवाडा (एकूण जागा ४६)

मविआ २७-२८
महायुती १७-१८
इतर २-३

मुंबई (एकूण जागा ३६)

मविआ १८-१९
महायुती १७-१८
इतर १-२

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा ३५)

मविआ १५-१६
महायुती १८-२१
इतर २

कोकण (एकूण जागा ३९)

मविआ १४-१५
महायुती २२-२३
इतर १-२