kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबईत पहिल्यांदाच खेळली जाणार ब्रजची फेमस ‘लठमार होळी’

होळी हा आपल्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. होळी हा उत्साह, आनंद आणि रंगांचा उत्सव आहे. पण हल्ली होळीचा सण लोक वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेट करताना दिसतात. DJ चा कर्णकर्कश आवाज, एकमेकांना रंग फासणे आणि त्यावर मद्यधुंद अवस्थेत केला जाणारा डान्स म्हणजेच होळी, असा लोकांचा समज झालेला आहे. पण हा गैरसमज दूर करून होळीचा खरा आनंद देण्यासाठी येत आहे ब्रजभूमीची लठमार होळी. वृंदावन, मथुरा, गोकुळ, नंदगाव आणि बरसाना येथे खेळल्या जाणाऱ्या होळीचा आनंद आता तुम्ही मुंबईतही घेऊ शकता. चला, मुंबईत खेळूया ब्रजची लठमार होळी!

‘ब्रजची लठमार होळी’ हा उत्सव मुंबईत नेहमी खेळल्या जाणाऱ्या होळीपेक्षा थोडा वेगळा आहे. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे चित्र-विचित्र वर्तन, कर्णकर्कश आवाज, प्रचंड गर्दी किंवा दारूचा सहभाग नसणार आहे. होय, हा कार्यक्रम दारूमुक्त आणि धूम्रपानमुक्त आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य कोणत्याही अडचणीशिवाय लठमार होळीचा आनंद घेऊ शकतात. कारण हा उपक्रम म्हणजे धांगड-धिंगाणा घालणारी पार्टी नसून, एक सांस्कृतिक आणि कौटुंबिक उत्सव आहे.

बृज की लठमार होली हा क्रार्यक्रम खास मुंबईकरांसाठी होणार आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचं महत्व काय हे समजावून द्यायचं असेल तर लठमार होळी हा एक उत्तम कार्यक्रम आहे.

हा फक्त इव्हेंट नसून केवळ छान छान फोटोंपूरताच मर्यादित राहणार नाही तर सोबतच एक अविस्मरणीय अनुभव देखील मिळेल. हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबासाठी आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा यांना विशेष महत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे लहान मुलं, महिला आणि वृद्ध मंडळी अगदी निर्धास्तपणे होऊन या होळीचा आनंद घेऊ शकतात.

हा कार्यक्रम 4 मार्च 2026 रोजी कांदिवली पश्चिम, मुंबई येथे होणार आहे. येथे क्लिक करून तुम्ही कार्यक्रमाचे तिकिट खरेदी करू शकता. प्रवेश पास मर्यादित आहेत.

एकदा बुकिंग झाल्यावर पास रद्द करता येणार नाही, पैसे परत मिळणार नाहीत किंवा पास दुसऱ्याला देता येणार नाही. या होळीला तुम्हाला जर काहीतरी वेगळं, शांत आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव घ्यायचा असेल तर या कार्यक्रमात नक्की भाग घ्या.