kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

12 वी परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा गुणपत्रिका कशी डाउनलोड करावी

बारावी परीक्षेत यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभाग पाहिला तर लातूर पॅटर्न सर्वात शेवटी गेला आहे. बारावीचा निकाल एकूण ८९.७९ टक्के लागला असून, कोकण विभाग अव्वल तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये जी परीक्षा घेण्यात आली त्यात कोकण विभागाचा 94.14 टक्के, पुणे विभागाचा 91.25 टक्के, अमरावती विभागाचा 90.92 टक्के, नाशिक विभागाचा 90.72 टक्के, मुंबई विभागाचा 90.08 टक्के, कोल्हापूर विभागाचा 89.97 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.86 टक्के, नागपूर विभागाचा 88.67 टक्के आणि लातूर विभागाचा 84.14 टक्के निकाल लागला असून एकूण निकाल 89.97 टक्के एवढा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज, शनिवार, 2 मे 2026 रोजी महाराष्ट्र HSC इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर (MSBSHSE HSC Result) केला. विद्यार्थी आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील; तसंच, निकालाची लिंक सक्रिय होताच त्यांचे गुणपत्रक (Scorecard) त्वरित उपलब्ध होईल. गेल्या वर्षी हे निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आले होते; मात्र या वर्षी, निकाल तीन दिवस आधीच प्रसिद्ध केला जातोय. विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. लाखो विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची (Maharashtra Board 12th Result) आतुरतेनं वाट पाहिली. बोर्डानं सर्व तयारी पूर्ण करुन, निकाल प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स : विद्यार्थ्यांना महाराष्ट्र HSC निकाल 2026 खालील (HSC Exam 2026) अधिकृत वेबसाइट्सवरून तपासता येईल.

https://mahahsscboard.in
mahresult. nic. in
https://results.digilocker.gov.in
https://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com

याशिवाय, डिजीलॉकर (DigiLocker HSC Result) आणि एसएमएस सुविधेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. डिजीलॉकरनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते.

निकाल कसा तपासावा? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन)

महाराष्ट्र एचएससी निकाल 2026 तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील सोप्या पद्धतीचं पालन करावं.

1.महा SSC मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा mahresult.nic.in ला भेट द्या.

  1. होमपेजवर उपलब्ध असलेला “Maharashtra HSC Result 2026” लिंकवर क्लिक करा.
  2. रोल नंबर, आईचं नाव किंवा इतर विचारलेली माहिती भरून सबमिट करा.
  3. स्क्रीनवर निकाल दिसेल.
  4. प्रोव्हिजनल मार्कशीट डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा. नंतर शाळेतून मूळ मार्कशीट घ्या.

विद्यार्थ्यांनी निकाल तपासताना अधिकृत वेबसाइट्सचा वापर करावा आणि फेक वेबसाइट्सपासून सावध राहावं. निकालानंतर मार्कशीटसाठी शाळेशी संपर्क साधावा.

एचएससी परीक्षा 2026: महाराष्ट्र एचएससी परीक्षा 2026 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आली. यंदा राज्यभरात एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

विज्ञान शाखा: 7,99,773 विद्यार्थी
कला शाखा: 3,80,692 विद्यार्थी
वाणिज्य शाखा: 3,20,152 विद्यार्थी
व्यावसायिक (व्होकेशनल) शाखा: 27,378 विद्यार्थी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI): 4,492 विद्यार्थी

परीक्षा 3,387 केंद्रांवर घेण्यात आली. यात मुली आणि मुलांचा सहभाग लक्षणीय होता. बोर्डानं परीक्षा पारदर्शक आणि सुव्यवस्थित रीतीनं घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल : गेल्या वर्षी महाराष्ट्र एचएससी निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाला होता. यंदा बोर्डानं तीन दिवस आधी निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळेल. बोर्डानं कर्मचारी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं निकाल प्रक्रिया वेगवान केली आहे.

काही महत्त्वाच्या सूचना 

निकाल तपासताना मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर स्थिर इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा.

रोल नंबर आणि आईचं नाव योग्यरित्या टाइप करा.

प्रोव्हिजनल मार्कशीट प्रिंट घ्या, पण मूळ प्रमाणपत्र शाळेतून घ्या.

रीव्हॅल्यूएशनसाठी नंतर सूचना जाहीर केल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *