kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान !

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बंगाली भाषेतून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह आणखी 5 नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सुवेंदु अधिकारी यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशीथ प्रामाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. महत्वाचं म्हणजे हे भाजपचं पश्चिम बंगालमधील पहिलं सरकार आहे.

दरम्यान, आज शपथविधी सोहळा पार पडण्यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते, “पश्चिम बंगालसाठी ही खरोखरच ऐतिहासिक सकाळ आहे. दूरदर्शी नेते, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘सीटी ऑफ जॉय’ कोलकात्यात आपले स्वागत आहे. हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आज स्वातंत्र्यानंतर प्रथमच पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. आमच्या संस्थापकांची स्वप्ने साकार होताना आम्ही पाहत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *