शुभेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील पोहोचल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित असणाऱ्या विविध राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना भेटले. मात्र एकनाथ शिंदेंसोबत नरेंद्र मोदी हातमिळवणी करत मंचावर बोलत बसले. नरेंद्र मोदी काहीतरी बोलताच एकनाथ शिंदे जोरजोरात हसले. मंचावर नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्यासमोर जास्त वेळ थांबले होते. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्या या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान, नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवला. शुभेंदू यांनी भवानीपूरमधून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केलाय. त्यांनी 2021 मध्येही ममता यांचा पराभव केला होता.













Leave a Reply