आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर त्यांना अटक करण्यात आलीये. आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.