अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. याविषयी रुग्णालयाकडून अथवा पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही. पण ANI आणि PTI या वृत्तसंस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली, तर या आरोपींना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आलेली. सोनू चंदर आणि अनुज थापन अशी पंजाबमधून अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.