डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेताेड टीका केली आहे. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत. कंपन्या हटवू शकतील की नाही या बाबत मी साशंक झालोय आत्ता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डोेंबिवलीतील कंपन्यात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहे. अमूदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर त्यांनी सरकारवर हे टिकास्त्र सोडले आहे. बुधवारी पुन्हा डोंबिवलीतील कंपनीला आग लागली. तेव्हा त्याठिकाणी्ता अग्निशमनच्या गाड्या जाताना त्रास होतोय. यठिकाणी मेट्रोचा कल्याण शीळचा भाग कमी आहे. हे काम तळोजापासून सुरु करायला हवे होते. त्या दरम्यान कल्याण शीळ मार्गावरील पर्याची रस्ते तयार करायला हवे हवेत.

हे काम केले नाही तर रास्ता रोको करुन मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. डोंबिवली पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवकजालिंदर पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने या भागातील पाणी आणि रस्ते समस्यावर आमदार पाटील यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार पाटील हे हजर होते. त्यांनी सांगितले की, या समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढून असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.