या सारसबागच्या गणपतीची हिवाळ्यामध्ये खास चर्चा रंगते, याचं कारण म्हणजे या गणपतीला हिवाळ्यात चक्क स्वेटर घातला जातो. यंदाही थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात आलं आहे.

जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते. सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती असेही म्हटले जाते. दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात. सुंदर अशा लोकरच्या स्वेटरमध्ये गणपती खूप सुंदर दिसतोय. दरवर्षी अशाच पद्धतीने स्वेटर परिधान करण्यात येतं.