kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मक – एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू

 पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने "पीसीयू - कोरिया फॅसिलिटेशन सेंटर" ची स्थापना केली आहे, हे केंद्र भारत - कोरिया उद्योग, व्यवसायाला चालना देण्यास उपयुक्त ठरेल. आता लवकरच याच्या समन्वयासाठी एक खिडकी योजना सुरू करू असे प्रतिपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (आयएएस) यांनी केले.
 अनेक कोरियन कंपन्यांनी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखाने उभारणी व गुंतवणुक प्रस्ताव दिले आहेत. अशा प्रकारचे संवाद सत्र दर तीन महिन्यांनी मुंबईतील कोरिया प्रजासत्ताकाचे वाणिज्य दूत, कोरियन उद्योग प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या समवेत आयोजित केले जाईल असेही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (आयएएस) यांनी सांगितले.

    स्वागत, प्रास्ताविक करताना पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, भारत–कोरिया सहकार्यास नवे बळ देण्यासाठी "पीसीयू - कोरिया फॅसिलिटेशन सेंटर" स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोरियन कंपन्या, एमआयडीसी अधिकारी आणि विविध भागधारक यांना एका व्यासपीठावर आणण्यात पीसीयूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.