शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. माघी गणेशोत्सवात राज्य सरकारने नोटिसा बजवल्या त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “एकीकडे कुंभ सुरू आहे सर्वत्र आहे तुम्हाला कोणाच्या भावना दुखवायचे नाही. दुसरीकडे गणपती मुर्त्या विसर्जन करु देत नाहीत इतका त्यांचे हिंदुत्व? मला गणपती मंडळांनी पत्र दिले. पीओपी मूर्ती असल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन करू नका, असे पत्र आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान डुबकी मारतात ते चालते. पण मुर्त्या बुडवू देत नाहीत. मुंबईत ठिकठिकाणी मुर्त्या अशाच ठेवल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांनी माहिती घ्या, किती ठिकाणी मुर्त्या विसर्जन करायच्या राहिल्या आहेत, मग ठरवू काय करायचे.”

शिक्षण प्रणालीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शिक्षणात अमूलग्र बदल केला पाहिजे म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, हे सांगितले जात नाही. पण शिकवणारा तज्ज्ञ असायला पाहिजे ना? तो कॉन्ट्रॅकवर भरला जात असले तर कसे चांगले शिकवणार? तुम्ही अभ्यास बदला अन्यथा काही करा पण शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळे कोणाचे नाहीत.”

विधानसभा निकालावरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “विधानसभा निवडणूक आम्हाला अजूनही मान्य नाही. जाईल तिथे लोक हे कसे शक्य आहे? असा प्रश्न मला विचारत आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तर अनेक लोक झोपेत उठून प्रतिक्रिया द्यायला आले. एवढ्या दिवस झोपलेले आता जागे झाले. हे दळभद्री सरकार काय काम करतय बघा. लाडकी बहीण योजना आणली. परंतु आता किती महिलांना डावलले जात आहे. योजना सांगितल्या त्या किती? आता सुरु आहेत किती? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.”