kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्येची घटना निंदनीय आणि दुर्दैवी आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मनाला दुःख देणारी घटना आहे. ही घटना सहन करण्याच्या पलिकडची आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जे कोणी दोषी आहेत त्या कोणालाही सोडणार नाही आणि सर्व आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड भागातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून १७ मे २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पळून गेले होते. तर पती शशांक सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पती आणि सासरे यांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पुणे जिल्ह्यातील अनेक भागात टीम रवाना केल्या होत्या. त्याच दरम्यान काल पहाटेच्या सुमारास सासरे रविंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता, दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांचे ९ महिन्यांचे बाळ हगवणे कुटुंबियांच्या घरी आढळून आले नाही. हे बाळ कुठे गेले आणि कोणाकडे असेल याचा शोध पोलीस आणि वैष्णवी हगवणे यांचे कुटुंबिय घेऊन लागले. त्याच दरम्यान वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे यांचे मित्र निलेश चव्हाण यांच्याकडे माहीती मिळाली. त्यानंतर वैष्णवी यांचे कुटुंबिय निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ मागण्यांसाठी गेले. त्यावेळी निलेश चव्हाण याने बंदुकीचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतर या प्रकरणी बंदुकीचा धाक दाखविल्या प्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.