kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अरे बापरे ; एक सल्ला , एक रिप्लाय आणि पोस्टच डिलीट ; राणे बंधूंमध्ये चाललंय काय ??

राज्यात राजकीय वर्तुळात बंधूंची चर्चा रंगताना दिसतीये. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा चालू आहे तर दुसरीकडे राणे बंधूंच्या वादाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे यांना सल्ला देणारी पोस्ट डिलीट केली आहे. नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्या पोस्टला रिप्लाय देखील दिला होता. या दोन्ही पोस्टची चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर निलेश राणे यांनी अखेर त्यांची पोस्ट डिलीट केली आहे.

नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.

सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.

आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.

निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याच्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असा रिप्लाय नितेश राणे यांनी दिला होता.

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी सल्ला दिला होता. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हा नियोजन समितीमधील निर्णयांवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद आहेत.