आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात. संजय गायकवाड हे सद्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. सध्या शीळ जेवण दिल्याने त्यांनी एका कॅन्टीनवाल्याला चोपलं असल्याचं समोर आलंय. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या व्हिडीओनंतर आता आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण काय म्हणालय ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा…अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणी मुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले.
संजय राऊत :
जर डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये गोर-गरिबांच्या घरामध्ये आदिवासी पाड्यावर मिळते. मोदी जे केही फुकट धान्य वाटतायेत त्याची क्वालिटी पाहा. फक्त आमदारांना ५० कोटी मिळाले आहेत, ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. कँटीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच, पण टॉवलवर मारहाण करायची का? आमदाराने मारहाण करायची आणि आपली बाजू मांडायची की मला डाळ, भात मिळाली नाही. मला असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. मारहाण करण्याआधी सभागृहात हा विषय मांडू शकता. मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि त्यांचे आमदार राज्यीतील दुर्बल आहेत. ते आरेला कारे करू शकत नाही त्यांनाच मारत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलं आहे.
ज्योती गायकवाड :
“संजय गायकवाड यांनी जे कृत्य केल आहे ते चुकीच आहे. आम्ही त्याचं कधीच समर्थन करू शकत नाही, कारण आम्ही संविधान मानतो. यासंदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठवला पाहिजे होता. अजून अधिवेशन संपल नाही आहे. त्यामुळे धारावीच्या मुद्द्यावरून मी आवाज उचलणार आहे मी आमदार आहे त्या विभागाची” असं ज्योती गायकवाड म्हणाल्या.
सचिन अहिर :
“संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली आहे, ती चुकीची आहे. पण त्यांनी जे मांडल ते योग्य आहे. पण संजय गायकवाड यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड अम्बेसेडर केला पाहिजे” असं सचिन अहिर म्हणाले. “गिरणी कामगारांना मुंबईतून बाहेर फेकण्याचा हा सरकारचा डाव आहे. मुंबईमधील जमीन ही अदानीसाठी देता, तुम्ही मग या मराठी गिरणी कामगारांवर अन्याय का करता?” असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला.
अयोध्या पोळ :
गरिबांवर हात उचलणारे संजय गायकवाड सारखे #माजोरडे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहेत..
देवेंद्र फडणवीस काही कारवाई करणार की संजय गायकवाडला गोंजारणार?
कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?
आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.














