kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रामनाथ ठाकूर उपराष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार??

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. सध्या या पदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. मात्र बुधवारी (23 जुलै) जे पी नड्डा यांनी राज्यसभेचे खासदार तथा केंद्रीय कृषीराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. नड्डा आणि ठाकूर यांच्या भेटीचा हा प्रसंग फारच विशेष मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

कर्पुरी ठाकूर यांनी केलेल्या कामामुळे रामनाथ ठाकूर यांचे बिहार तसेच संपूर्ण देशात एक वेगळे वजन आहे. रामनाथ ठाकूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे नेते असल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी केंद्र सरकारने रामनाथ ठाकूर यांचे वडील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

दरम्यान, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाकडून नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. तशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले तसेच नियुक्त केलेले खासदार मदतान करू शकतील. आमची तयारी पूर्ण झाल्यावर लवकरात लवकरच उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.