‘बिग बॉस 17’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पकी विकी जैन यांनी एकत्र एन्ट्री केली होती. शोमध्ये अंकिता – विकी यांच्यात अनेक कारणांमुळे वाद झाले. अंकिता – विकी यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता हिने विकी याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.अंकिता म्हणाली, ‘मी जेव्हा बाहेर आली तेव्हा मीडिया होती. अनेक प्रश्न होते आणि माझ्यावर एकाप्रकारचा दबाव होता. तुमच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही. पण कधी-कधी काही गोष्टींचा दबाव वाटतो. लोकं आमच्या नात्याला जज करत होते. आम्हाला माहिती आमच्यात काय नातं आहे आणि त्याचा सांभाळ कसा करायला हवा. बिग बॉसमध्ये मी किंवा विकी जे काही बोललो त्याच्या आधारावर आमचं नाही…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात आमच्यात भांडणं सुरु झाली आणि त्याच घरात संपली. मी कोणत्या स्पर्धेत नाही. मी आदर्श नाही, पण मला माझं नातं फार चांगल्या प्रकारे माहिती आहे. कपल आपापल्या घरात भांडतात, पण कोणाला ते दिसत नाही. आम्हाला देखील माहित नव्हते की आम्ही इतकं भांडू. कारण आम्हाला कधीच कोणतीही अडचण आली नाही. आमची भांडणं तिथेच सुरू झाली आणि तिथेच संपली.’‘माझ्या आणि विकीच्या नात्यावर कोणीही काहीही बोलू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या.’ असं देखील अंकिता लोखंडे नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिची चर्चा रंगली आहे.