kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

हेमा मालिनींनी साश्रू नयनांनी पती धर्मेंद्र यांना दिला अखेरचा निरोप, भावुक करणारा Video Viral

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंहसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत होते. स्मशानभूमीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॉलीवूड सेलिब्रिटींसह सर्वसामान्य चाहत्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पण तिथला हेमा मालिनी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आज हेमा व ईशा यांचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.

धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी व त्यांची लेक ईशा देओल स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. खचलेल्या हेमा मालिनी यांच्याबरोबर लेक ईशा गाडीत होती. यावेळी हेमा व ईशा भावुक झाल्या. यावेळी त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.

अमिताभ बच्चन व त्यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘शोले’मध्ये वीरूची भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी अगस्त्यबरोबर ‘इक्किस’ या सिनेमात काम केलं आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांचे निधन झाले.

शिल्पा शेट्टी, करण जोहर, सचिन पिळगांवकर, अजय देवगण, करीना कपूर खान, कियारा अडवाणी, कपिल शर्मा, अक्षय कुमार, काजोलसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि शोक व्यक्त केला.