kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार ?

राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका हा सध्या चर्चेत असलेल्या विषय आहे. कुठे युती , कुठे आघाडी होणार ? जागा वाटपाबाबत कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे ? अशा विविध प्रश्नांना उधाण आले आहे. अशातच, राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. तसे संकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावरही शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले असून या युतीच्या मुहूर्तही त्यांनी सांगितलाय.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांची रात्री बैठक झाली. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याबाबत ठरवलं आहे. जागा वाटपासाठी दोन-दोन पावलं आम्ही मागे घेणार आहोत. त्या अनुषंगाने पक्षाची तयारीही झाली आहे. किंबहुना येत्या २५ किंवा २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार असल्याची माहिती अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी पक्षाचा राजीनामा देईल असा निर्वाणीचा इशारा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पुण्यात भाजपला शह देण्यासाठी अजित पवार यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे.

या मुद्दयावर बोलताना सुभाष जगताप म्हणाले की, , प्रशांत जगताप कालच्या बैठकीला नव्हते. विशाल तांबे, वंदना चव्हाण यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. २५ किंवा २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार, असेही ते म्हणाले. सोबतच पक्षाच्या तयारीची माहितीही प्रशांत जगताप यांनी दिली. त्यामुळे एकीकडे विरोधाची किनार असताना आता यावर शरद पवार गटाकडून कशाप्रकारे तोडगा काढला जाणार, हे बघावे लागेल. तसेच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणता राजकीय पर्याय आजमवणार याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे.