सुनेत्रा पवार विद्याप्रतिष्ठान येथे पोहोचल्या असून जड अंतःकरणाने त्या दादांच्या पार्थिवाकडे निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या नणंद सप्रिया सुळे यांनी त्यांना सावरलं. त्यांचा हात घट्ट पकडून मी तुझ्या दुःखात सहभागी असल्याची जाणीव करून दिली.
काय घडलं होत ?
पुण्यातील बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजित पवारांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.















