kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केली आहे.

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. परंतु त्याबाबत संबंधितांविरुद्ध प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई प्रशासकीय स्वरूपाची असून वेळ काढूपणाची आहे. एमआरडीच्या अनेक कंत्राट कामात ह्यापूर्वीही अनेक वेळा भ्रष्ट कारभार झाला असून त्यात एमआरडीच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे आढळले आहे. त्यामुळे सदरील भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने संबंधित कंत्राटदार कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे. तरी, मे. डी. एस. इंटरप्रायसेस कंपनीला काळ्या यादीत टाकून कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केली असून श्रीमती.रुबल अग्रवाल मुख्य व्यवस्थापक, महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दरम्यान, रुबल यांनी चौकशी कमिटी स्थापन केली आहे.दहा दिवसांमध्ये अहवाल आल्यानंतर कंपनीच्या विरोधात कारवाई करून त्यांना कळ्या यादी टाकणार, पुरेशे मनुष्य बळ न पुरवताही जो भ्रष्टाचार झालाय त्याचे रक्कम देखील वसूल करणार असे आश्वासन दिले. मेट्रो दोन आणि सात मार्गे साठी 500 इतके मनुष्यबळ पुरवण्याची कंत्रालय एका संस्थेत देण्यात आले असता त्या संस्थेकडून दहा टक्के मनुष्यबळ कमी पुरवले जात होते.मात्र तरीही कंत्रालयाला मोबदला शंभर टक्के पाचशे माणसासाठी मोबदला दिला जात होता.