kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘एक नंबर तुझी कंबर’ मराठी गाण्यावर थिरकली विदेशी तरुणी !!

नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणं केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगभर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचा ट्रेंड सध्या Instagram Reels वर अक्षरशः गाजतोय. अनेक इन्फ्लुएन्सर्स, प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री आणि युझर्सनी यावर थिरकत धमाल परफॉर्मन्स दिले आहेत. खास करून ‘कंबर’ हलवणाऱ्या स्टेप्समुळे हे गाणं लक्षणीय प्रमाणात वायरल झालं आहे.

अशाच एका विदेशी तरुणीने या गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवरही झपाट्याने व्हायरल होत आहे. तिने खूप सुंदर आणि आकर्षक डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये विदेशी तरुणी रस्त्याच्या कडेला उभी आहे आणि ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर बेधुंद होऊन डान्स करताना दिसतेय.

गुलाबी ड्रेस तिच्यावर अतिशय छान दिसतोय. तिच्या हावभावातली खास अदा आणि तिचे स्टेप्स देखील तालासुरावर अगदी अगदी जुळतात, ज्यामुळे तिचा डान्स अजूनच मोहक बनतोय.

हा व्हिडीओ Instagram वरील @baby.rai_1111 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओला 60 लाखांहून अधिक views मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत या तरुणीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. तर तुम्हाला हा डान्स कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया शेअर करा.