kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कौतुकास्पद ! रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन मार्फत बांधण्यात आला बंधारा

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन मार्फत शहापूर जवळील उठावा गाव इथे पाण्याच्या समस्येवर निवारण म्हणून एक बंधारा बांधण्यात आला.

या बंधाऱ्याचे लोकार्पण दिनांक 15 जून रोजी रोटरी प्रांतपाल श्री मिलिंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाले. या बंधाऱ्यामुळे गावातील 100 कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल आणि गावातील विहिरींचा जलस्तर वाढेल असे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी रोटरीचे उप प्रांतपाल शैलेश गुप्ते, उप प्रशिक्षक सलील जोशी, रोटरी क्लबचे सदस्य, गावचे सरपंच भगत साहेब व उपसरपंच अजय कथोरे, जिल्हा परिषद शाळेचे मगर सर, माऊली ग्रुपचे चारुदत्त कोलारकर, पंकज दातार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या बंधाऱ्याचे प्रकल्प प्रमुख रो सुनील सरोदे, रो विकास डोके आणि रो बाळु घुले होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदिप बुडबाडकर आणि सचिव श्रीनिवासन मुदलीयार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

One comment
Rtn. Milind Mohite

The need of the hour for our society is to make maximum utilization of natural resources & to work on it. May be it rain /solar/wind /minerals/trees plantation. We all need to work on it.

Thanks Rotary Club of Dombivli Midtown to take initiative on it.