kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

राज्यातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा अजित पवार ठरल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. नुकतीच त्यांची गटनेते पदी निवड झालेली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ठराव मांडला तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन केले.

शपथविधीपूर्वी दुपारी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली गेली. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं.