kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत केलं मोठं वक्तव्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्येच लढवल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जीथे आपली जागा भक्कम असेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी देखील भूमिका मांडण्यात येत आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर थेट भाजपावर आरोपच केला आहे, भाजप सर्वांसमोर महायुतीबाबत बोलते, आणि एकंतात स्वबळाचा विचार करते असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ही निवडणुका महायुती म्हणून लढवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

कोण युती आघाडी करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये कोणीही युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे, केलेल्या कामाच्या जोरावर महायुतीच जिंकणार, महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार, पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीला केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळालेली आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलो आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.