kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

युतीत बिघाडी ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांनी बोलावलेल्या आणखी एका महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला हजर नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान यापूर्वी देखील पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन तर रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना मिळालं. त्यामुळे शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. ते त्यानंतर आपलं मुळगाव असलेल्या दरेगावला गेले होते. शिंदेंच्या नाराजीनंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले, त्यानंतर बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.