kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गौरव मोरेने ‘हास्यजत्रे’ला केला रामराम ?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. छोट्या पडद्यावरील हा शो खूप लोकप्रिय देखील आहे. या शो मधील गौरव मोरे यांचे विनोदाचे टायमिंग, पंचेस यामुळे त्याचं स्किट नेहमीच बहारदार होतं आणि प्रेक्षकांनाही खूप आवडतं. मात्र एका घटनेमुळे आता अभिनेते गौरव मोरे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो ला रामराम केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

गौरव मोरे याची नुकतीच ‘मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हंसाएंगे’ या शोमध्ये एंट्री झाली असून हा कॉमेडी शो सोनी एंटरटेनमेंट चॅनेलवर दिसणार आहे. सोनी टीव्हीने या शोचा एक प्रोमो शेअर केला असून त्यामध्ये गौरव मोरेही झळकला आहे. त्याच्या शिवाय या शोमध्ये हेमांगी कवी, कुशल बद्रिके तसेच सृष्टी रोजे, बलराज सयाल, सुगंधा मिश्रा हे सर्व कलाकारही फुल्ल धमाल करताना दिसणार आहेत.