kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं ‘हे’ खास सरप्राईज!

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच त्यांच्या प्रवासादरम्यान विमानात एक स्पेशल शुभेच्छा त्यांना देण्यात आलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली. “आपल्या विमानात एक अशी व्यक्ती आहे जिचा आज वाढदिवस आहे आणि आज ती ७३ वर्षांची झाली आहे. ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे आणि तिचं नाव रोहिणी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त टाळ्या वाजवून तिला शुभेच्छा देऊयात.”

“आज रोहिणी हट्टंगडी यांचा वाढदिवस! हॅप्पी बर्थडे रोहिणी हट्टंगडी ताई. त्या सध्या अमेरिकेत, “चारचौघी” नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या सिॲटल ते सॅन होजे विमानप्रवास करत असताना, अचानक एयरलाईन्स तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अत्त्युच्च आनंदी क्षण .” संजय पेठे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि असं कॅप्शन दिलं.