kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं ; अमित शाह यांचा इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा

कोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. अमित शाह म्हणाले, अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो. आज हनुमान जयंती आहे. आता थोड्या दिवसांपुर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. इंडिया आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही. पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घघाटनही केलं.

अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधताना म्हटलं आहे. 70 वर्ष राम मंदिर अडकवून ठेवलं. राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं. पंतप्रधानांची देशभरात विकासाठी कावड यात्रा, विकसित भारतासाठी पंतप्रधानांची कावड यात्रा आहे, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राने संकल्प करायचा आहे की, प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे. काश्मीर आपलं आहे की नाही आहे. खरगे म्हणतात राजस्थान आणि महाराष्ट्राचे काश्मिरशी काय देणे-घेणे. मोदींनी 370 हटवून काश्मिरला कायमचा देशाचा हिस्सा बनवलं. काँग्रेसने भारताची अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावर ठेवली होती. पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करा आपण भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची करू, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अकोल्यातील भाजपच्या सभास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आगमन नियोजित वेळेपेक्षा उशिराने झालं. पावसामुळे अमित शाह यांचं हेलिकॉप्टर पोहोचण्यास उशीर झाला. अमित शाहांच्या सभेआधी सभास्थळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शाहांच्या सभेसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शाह यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा होत झाली. 21 एप्रिलची योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्यावर अमित शाहांना मैदानात उतरवत अकोल्यात प्रचारात मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शाहा यांच्यासह व्यासपीठावर उमेदवार अनुप धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार अमोल मिटकरी, विभागातील अनेक भाजप आमदारांसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.