लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत करत तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली आहे. नितीन गडकरी हे सुरुवातीपासूनच लीडवर होते. त्यांनी १ लाख १० हजार मतांनी विजय मिळवला आहे.

नागपूर हा भाजपचा गड राहिलेला आहे. येथून यंदाच्या निवडणुकीत मंत्री नितीन गडकरींना भाजपने रिंगणात उतरवलं होतं. तर त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना मैदानात उतरवण्यात आले. गडकरी यांच्याकडे मंत्रीपदाचा दांडगा अनुभव आहे. त्यांना गेल्या पाच वर्षात देशातच नाही तर नागपुरातही रस्ते बांधकामात मोठं काम केलं आहे.