आंतरराष्ट्रीय पातळीवर मिडिल-ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या आणि तणावाच्या परिस्थितीचा थेट फटका आता मुंबईतील वाहनधारकांच्या खिशाला बसू लागला आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत प्रति किलोग्राम 2 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील सीएनजी वितरण कंपनीने ही दरवाढ लागू केली असून, याचे नवे दर 29 मे च्या मध्यरात्रीपासून अमलात आले आहेत.
सीएनजीच्या दरात 2 रुपयांच्या वाढीनंतर मुंबई आणि परिसरातील सीएनजीचे किरकोळ दर 84 रुपये प्रतिकिलोवरून 86 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलिंडर आणि इतर इंधनाच्या दरात जागतिक घडामोडींमुळे अनिश्चितता निर्माण झाली असतानाच, आता सीएनजी देखील महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.













Leave a Reply