kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोरोनानंतर चीन बनला नव्या आजाराचा हॉटस्पॉट, देशभरात हाहाकार

युद्धामुळे आधीच जगावर एक मोठं संकट असताना आता चीनमधून मोठी बातमी समोर येत आहे. चीनमध्ये एक नवा आजार झपाट्यानं पसरत आहे. हा आजार जनावरांना होत आहे, त्यामुळे आता चीन सरकारने खबरदारी म्हणून जनावरं मारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे, तसेच चीनच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान या आजाराची माणसाला लागण झाल्याचं एकही प्रकरण अद्याप समोर आलं नसल्याचं देखील चीनने म्हटलं आहे. तसेच हा आजार परदेशातून चीनमध्ये आला असा दावा देखील चीनकडून करण्यात आला आहे.

चीनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या आजाराची संगळी लक्षण ही सेरोटाइपची आहेत. त्यावर देशामध्ये लसीकरण उपलब्ध असल्याची माहिती देखील चीनने दिली आहे. हा आजार परदेशातून चीनमध्ये आल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. विशेष: उत्तर पश्चिम चीनमध्ये या आजाराचा प्रचंड उद्रेक झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *