पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल थेट पक्षाकडे सादर करणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. धंगेकर निवडून यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलीच कंबर कसली आहे. धंगेकर यांचं काम करत असताना शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाली आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी विदर्भातील यशोमती ठाकूर, सुनील केदार, धीरज लिंगडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, अमित झनक, राजू आवळे या दहा आमदाराची टीम पुण्यात उतरविली आहे. यामधील यशोमती ठाकूर, सुनील केदार यांची पुणे लोकसभा मतदारसंघात निरिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनात्मक बांधणी, प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी याचं नियोजन नाना पटोले यांनी हातात घेतलेलं आहे. हे सर्व आमदार दररोज पक्षाला रिपोर्ट देणार आहेत. त्यामुळे कॉग्रेसची सर्व शहर यंत्रणा जाेमाने कामाला लागणार आहे.