Breaking News

निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये संभाव्य लढतीची शक्यता आहे. भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. निलेश राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे निलेश राणे कुडाळमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदान उतरणार असल्याची दाट शक्यता आहे.

निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतल्यास वैभव नाईक आणि निलेश राणे कुडाळमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 पैकी 2 विधानसभा भाजप, तर एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचंही चित्र आहे. भाजपच्या दोन जागांपैकी कणकवलीच्या जागेवर नितेश राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

निलेश राणे कुडाळमधून इच्छूक असल्यामुळे नारायण राणेंनी शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. निलेश राणेंच्या उमेदवारीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंगळवारी 15 ऑक्टोबरला नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंसोबतही कुडाळ मतदारसंघासंदर्भात चर्चा केली. 2 ऑक्टोबरला देखील नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती.