Breaking News

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी याविरोधात आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यापुढे आंदेलन केले होते. शहरातील चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपकडून आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय गोंधळ वाढला आहे.