kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सोशल मीडियाच्या जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला नवा इतिहास !

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदी जगातील सर्व नेत्यांपेक्षा पुढे आहेत. पंतप्रधान मोदींचे 100 मिलियन+ फॉलोअर्स आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांचे 43.2 मिलियन, प्राबोवो सुबियांतो यांचे 15 मिलियन, लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचे 14.4 मिलियन, रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे 11.6 मिलियन आणि जेवियर मायली यांचे 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पटाहून अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॉलोवर्स 100 मिलियन+ पोहोचले असताना, योगी आदित्यनाथ 16.1 मिलियन आणि राहुल गांधींचे 12.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून हे स्पष्ट होते की सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी इतर भारतीय नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.

X आणि Facebook वरही लोकप्रियता

इंस्टाग्राम व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप लोकप्रिय आहेत. X (पूर्वीचे Twitter) वर मोदींचे 106.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर फेसबूकवर 54 मिलियन फॉलोअर्स आहेत. हे आकडे त्यांचे जागतिक प्रभाव आणि डिजिटल पोहोच दर्शवतात. तरुणांमध्ये त्यांची मजबूत पकड असल्याचे निदर्शनास आणतात.

स्टॅटिस्टा आणि मॉर्निंग कन्सल्टनुसार, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नाही. स्टॅटिस्टानुसार 70% अप्रुव्हल रेटिंग हे जगात सर्वात जास्त आहे. तर मॉर्निंग कन्सल्ट (फेब्रुवारी 2026) 67% अप्रुव्हल रेटिंग, डोनाल्ड ट्रम्प 40% अप्रुव्हल रेटिंगसह 11 व्या स्थानावर आहेत. हे डिजिटल युगात मोदींच्या जागतिक प्रभावाचे नवीन उदाहरण आहे.