अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे १४वे एक दिवसीय साहित्य व काव्य संमेलन कल्याण जवळील कोन गांवात म्हात्रे सभागृहात संपन्न झाले. यावेळी दैनिक प्रहारचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सदाशिव तथा बापू वैद्य यांना प्रतिष्ठेचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे १४वे एक दिवसीय साहित्य व काव्य संमेलन नुकतेच पार पडले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कवी डॉ. जयकुमार घुमटकर होते. सदर संमेलन आठगांव विद्यालय येथे झाले यावेळी अग्रवाल काॅलेजचे संचालक पंडित सर,कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच सह शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ, अनेक कवी आणि साहित्यक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.













